Environmental Geography-1 पर्यावरण भूगोल भाग-१

ISBN Number : 978-93-5596-007-8

Student Price : Rs.260

Student Dollar Price : 10$

Library Price : Rs.895

Library Dollar Price : 36$

Book Edition : First

Year of Publication : 2022

No. Of Pages : 159

Book Weight :258

About The Book

'पर्यावरण भूगोल - १' हे पाठ्यपुस्तक विद्यार्थी आणि प्राध्यापक बंधूंच्या हाती सुपूर्द करताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या जून २०२० पासूनच्या व्दितीय वर्ष कला, पेपर क्रमांक-२, सेमिस्टर-३ साठी, नवीन सुधारित अभ्यासक्रमानुसार लिहिलेले हे पुस्तक असले तरी, महाराष्ट्रातील विविध विद्यापीठातील प्राध्यापक व बी.ए. च्या विद्यार्थ्यांना उपयुक्त ठरेल याचा विचार करून सादर लिखाण करण्यात आलेले आहे.

भूगोल विषयाची बांधिलकी, अध्ययन व अध्यापनाच्या प्रदीर्घ अनुभव, तज्ञ तसेच अनुभवी व्यकितींशी चर्चा-संवाद, चालू घडामोडी व मूळ संदर्भ ग्रंथांच्या आधारे हे पुस्तक लिहिलेले आहे. पर्यावरण भूगोलातील पर्यावरणाचे महत्व, अभ्यास पद्धती, परिसंस्था, जैवविविधता, पर्यावरण प्रदूषण हे घटक तसेच उपघटकांचे सुलभ आकलन व्हावे यासाठी विषयाची मांडणी सुटसुटीत व मुद्देसूद करून विविध सारणी, आकृत्या, नकाशे, छायाचित्रे व उदाहरणांचा वापर केलेला आहे. या पुस्तकाचे प्रमुख वैशिष्ट्ये म्हणजे प्रत्येक प्रकरणाच्या शेवटी बहुपर्यायी प्रश्न व त्यांची उत्तरे दिलेली आहेत. याचा उपयोग सद्यस्थितीत विद्यार्थी व प्राध्यापक मित्रांना निश्चितच उपयुक्त ठरेल. सदरचे पुस्तक स्पर्धात्मक परीक्षा विशेषतः नेट/सेट परीक्षांना जास्तीत जास्त उपयुक्त होईल असाही प्रयत्न केलेला आहे. प्राध्यापक मित्र, अभ्यासक व विद्यार्थ्यांनी या पुस्तकात सुधारणा करण्याच्या दृष्टीने काही सूचना केल्यास, त्यांचे स्वागतच केले जाईल व पुढील आवृत्तीत निश्चितीपणे यथायोग्य बदल केले जातील.

 

Contents -

१. पर्यावरण भूगोल परिचय
२. परिसंस्था
३. जैवविविधता आणि तिचे संवर्धन
४. पर्यावरण प्रदूषण

About The Author

प्रा. डॉ. राजेंद्र ओंकार परमार (एम.ए., बी.एड., पीएच.डी.) हे भूगोल विभाग, चांगु काना ठाकूर महाविद्यालय, नवीन पनवेल, येथे सहा. प्राध्यापक म्हणून कार्यरत. एकूण अध्यापन २५ वर्षे, संशोधन मार्गदर्शक व मा. सदस्य, भूगोल अभ्यास मंडळ, मुंबई विद्यापीठ, पाच भूगोल संस्थांचे आजीव सभासद, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील जर्नल्स मध्ये २६ संशोधन लेख प्रकाशित, एकूण १७ पाठ्यपुस्तके व संदर्भ ग्रंथ प्रकाशित, विविध कार्यशाळा व चर्चासत्रांमध्ये ३३ ठिकाणी सादरीकरण, ४२ ठिकाणी सहभाग व २५ ठिकाणी साधन साधन व्यक्ती म्हणून कार्य. राष्ट्रीय स्तरावरील तीन व राज्य स्तरावरील तीन पुरस्कार प्राप्त.

प्रा. डॉ. सुधाकर जगन्नाथ बोरसे (एम.ए.,पीएच.डी., नेट) हे भूगोल विभाग, आर.एन.सी. आर्टस, जे.डी.बी. कॉमर्स व एन.एस.सी. सायन्स कॉलेज, नाशिक रोड, नाशिक. येथे १२ वर्षांपासून सहा. प्राध्यापक म्हणून कार्यरत. एका शैक्षणिक संस्थेचे आजीव सभासद. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय जर्नल्स मधून ३० संशोधन लेख प्रकाशित. एकूण २ पाठयपुस्तके प्रकाशित. विविध कार्यशाळा व चर्चासत्रामध्ये २० पेपरचे सादरीकरण व २४ ठिकाणी सहभाग. राष्ट्रीय स्तरावरील एक व राज्य स्तरावरील एक पुरस्कार प्राप्त.

प्रा. डॉ. चिंतामण भागुजी निगळे (एम.ए., बी.एड., पीएच.डी., सेट) हे भूगोल विभाग, मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे कर्मवीर गणपत दादा मोरे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय निफाड, जि. नाशिक येथे सहा. प्राध्यापक व भूगोल विभाग प्रमुख म्हणून कार्यरत. एकूण अध्यापन १४ वर्षे, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय जर्नल्स मधून १८ संशोधन लेख प्रकाशित. विविध कार्यशाळा व चर्चासत्रामध्ये २४ ठिकाणी सहभाग तसेच राष्ट्रीय स्तरावरील एक व राज्य स्तरावरील एक पुरस्कार प्राप्त.

प्रा. बाबाजी मोतीराम आहिरे (एम.ए., बी.एड.) हे भूगोल विभाग, मराठा विद्या प्रसारक समाजाचे कला व वाणिज्य महाविद्यालय सोयगाव, ता. मालेगाव, जि. नाशिक येथे सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत. अध्यापनाचा १७ वर्षाचा अनुभव, पीएच.डी. संशोधन करीत असून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील जर्नल्स मध्ये चार संशोधन लेख प्रकाशित. विविध कार्यशाळा व चर्चासत्रात सहभाग.

Book Reviews

Login Form
Username:
Password: