अर्थकथा संग्रह - नाव सांगणार नाही

ISBN Number : 978-93-5596-562-2

Library Price : Rs.975

Library Dollar Price : 39$

Book Edition : First

Year of Publication : 2022

No. Of Pages : 76

Book Weight :236

About The Book

संशोधनाच्या निमित्ताने नाशिक जिल्ह्यातील 15 तालुके आणि 60 गावांना भेट देऊन 961 स्त्रियांशी संवाद  साधतांना लेखिकेला जाणवले की आर्थिक सक्षमीकरण हाच स्त्री सक्षमीकरणाचा पाया आहे. आर्थिक स्वावलंबन असेल तर स्वाभिमानाने जगता येते. ध्येय साध्य करण्याच्या प्रवासात, स्वप्नांची पूर्तता करतांना कुटुंबाचा पाठिंबा असला तर जगण्याचा उत्सव होतो. दुर्दैवाने हे काहीही लाभले नाही तरी केवळ प्रबळ  इच्छाशक्ती सुद्धा स्त्री च्या जगण्याला नवे परिमाण देते. सुखी जीवन जगण्यासाठी फक्त पुस्तकी शिक्षण  पुरेसे नाही तर आवश्यक आहेत सकारात्मक विचार, सुखाची नवी व्याख्या करण्याची जिद्द आणि आलेल्या संकटांनी न डगमगता त्यांना आत्मविश्वासाने सामोरे जाऊन स्वतःची बलस्थाने ओळखणे, स्वतःच्या  सामथ्र्यावर विश्वास ठेवणे आणि आपल्या आयुष्याचे नेमके ध्येय ठरविणे. आजही भारतीय स्त्री सामाजिक  दबावामुळे आपली माहिती सांगायला सहजासहजी तयार होत नाही. आपण दिलेल्या माहितीचा गैरवापर तर होणार नाही? आपली आणि आपल्या कुटुंबाची प्रतिष्ठा तर धोक्यात येणार नाही? आपण आपली  संघर्ष कहाणी प्रकट केली तर भविष्यात नव्या समस्या तर निर्माण होणार नाहीत? असे अनेक प्रश्न तिला  पडतात. तरीही, लेखिकेच्या हेतूबद्दल निःशंक झाल्यानंतर, नाव सांगणार नाही हे वचन दिल्यानंतर सगळ्याजणी बोलत्या झाल्या आणि लेखिकेसमोर त्यांनी खुली केली आपली भावमंजुषा! त्यातील निवडक प्रेरणादायी जीवनकथा या कथा संग्रहात समाविष्ट केल्या आहेत. जगण्याला नवा अर्थ देणाऱ्या या कथा खऱ्या अर्थाने अर्थकथा आहेत. या सर्वसामान्य जीवन जगणाऱ्या असामान्य स्त्रिया आहेत कारण त्यांना त्यांच्या स्व-रूपाची ओळख पटली आहे आणि आपल्या विजिगीषु वृत्तीने या वीरांगना आपल्या जीवन संघर्षात विजयी ठरल्या आहेत. तथाकथित यशाच्या चैकटीत या जीवनकथा कदाचित बसणार नाहीत परंतु नैराश्याने अंधारलेल्या मनांना आशेचा प्रकाश नक्कीच देतील याची खात्री वाटते.

About The Author

डॉ. अश्लेषा कुलकर्णी उदयोन्मुख अर्थतज्ज्ञ आणि विद्यार्थीप्रिय प्राध्यापिका आहेत. विद्यार्थी दशेत सातत्याने नेत्रदीपक यश मिळवत त्यांनी गुणवत्ता यादीतील प्रथम क्रमांक सुवर्ण पदकासह कायम राखला. आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय, राज्यस्तरीय चर्चासत्रे आणि परिषदांमध्ये त्यांनी 45 शोधनिबंध सादर केले आहेत. त्यांनी 12 संस्कृत एकांकिकांचे आणि 6 मराठी एकांकिकांचे लेखन केले आहे. उत्तराखंड संस्कृत विद्यापीठातर्फे नाट्îलेखनाचे राष्ट्रीय पारितोषिक आणि ‘वारसा’ या एकांकिकेच्या लेखनासाठी मराठी नाट्यपरिषदेच्या पुरस्काराने त्या सन्मानित आहेत. अर्थशास्त्रातील सर्वोत्कृष्ट शोधनिबंधाचा राष्ट्रीय पुरस्कारही त्यांना मिळाला आहे. आविष्कार या महाराष्ट्र शासनाच्या संशोधन स्पर्धेत पुणे विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करतांना वैयक्तिक पारितोषिकासह त्यांनी पुणे विद्यापीठाला प्रावीण्य करंडक जिंकून दिला. वक्तृत्व, निबंध, कथाकथन, वादविवाद, पुष्परचना, नाट्य, पथनाट्य स्पर्धांमध्ये त्यांना 398 पारितोषिके मिळाली आहेत. नाशिक आकाशवाणीवर त्यांच्या इको बेसिक्स, जगण्याचे आधुनिक अर्थविज्ञान, पर्यावरणीय अर्थशास्त्र, चर्चेतील अर्थाक्षरे या मालिका प्रसारित झाल्या आहेत. या मालिकांतून त्यांनी अर्थसाक्षरतेचा प्रसार केला आहे. नाशिक आकाशवाणीवर इकॉनॉमिक सव्र्हे, किसान सन्मान योजना, उज्वला योजना, बजेट यांसारख्या आर्थिक विषयांवर अनेक मुलाखती प्रसारित झाल्या आहेत. स्पेक्ट्रम, दृष्टिकोन, दखल, सखी या कार्यक्रमांमध्ये विशेष निमंत्रित म्हणून त्यांनी सहभाग नोंदवला आहे. स्वामी विवेकानंद युवा गौरव पुरस्कार, यंग लेडी इकॉनॉमिस्ट अवॉर्ड आणि लोककवी वामनदादा कर्डक पुरस्काराने त्या सन्मानित आहेत. 

Book Reviews

Login Form
Username:
Password: